-
शिवानी रांगोळे ही मराठी चित्रपट, नाट्य आणि टीव्ही क्षेत्रातील एक अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
सध्या शिवानी तिच्या आगामी ‘कोण यशवंत पानसरे?’ या बहुप्रतीक्षित वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये शिवानी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
रसिकांना उत्सुकता लागलेली ही नवीन वेब सीरिज येत्या १६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या नवीन वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी तिने तिचे काही खास आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानीने निळ्या रंगाचा (Sky Blue) साधा पण अतिशय स्टायलिश टी-शर्ट परिधान केला आहे.
-
त्यासोबत तिने मॅचिंग डिझाइन असलेला डार्क निळ्या रंगाचा प्रिंटेड स्कर्ट परिधान करून एक सुंदर कॅज्युअल लूक तयार केला आहे.
-
मोकळे सोडलेले कुरळे केस, निळ्या रंगाची वजनदार कर्णफुले आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिचा हा लूक अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या फोटो पोस्टला तिने ‘Blues but the good ones!’ अशी खास कॅप्शन दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया