-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
एका संयुक्त कुटुंबातील भावनिक नातेसंबंध, प्रेम आणि दैनंदिन आयुष्यातील घडामोडींवर ही मालिका आधारित आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ची मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेत सध्या ‘जानकी’ गरोदर असल्याचा भाग दाखवला जात असून, या निमित्ताने रेश्माने इन्स्टाग्रामवर तिचे एक विशेष फोटोशूट शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये रेश्माने (जानकी) फिकट सोनेरी रंगाची अत्यंत सुंदर साडी परिधान केली आहे.
-
हे फोटो शेअर करत रेश्माने “काय होणार सांगा, मुलगा की मुलगी?” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
-
रेश्माच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत ‘जानकी’ला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
एक ॲपलमध्ये नोकरी करतोय, तर दुसऱ्याने सुरू केलंय स्टार्टअप; माधुरी दीक्षित म्हणाली, “मोठी झाली आता मुलं”