-
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री व कुशल शास्त्रीय नृत्यांगना ऊर्मिला कानेटकर ही नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
नुकतीच ऊर्मिलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन आणि अत्यंत आकर्षक फोटो शेअर केला आहे.
-
तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप (Crop Top) आणि आकाशी रंगाची कम्फर्टेबल लूज पॅन्ट परिधान केली आहे.
-
तिच्या क्रॉप टॉपवर इंग्रजीत एक मजेशीर संदेश लिहिला असून, मोकळे केस आणि चेहऱ्यावरील गोड हसू तिच्या लूकला अधिक खास बनवीत आहे.
-
आपला हा सुंदर आणि बिनधास्त लूक शेअर करीत तिने या पोस्टला ‘Let the world keep turning, I’ll be fine this way’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोंवर मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने ‘Fit n how’ अशी कमेंट केली आहे.
-
ऊर्मिलाचा हा नवीन कॅज्युअल अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून, तिच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
७ नोव्हेंबर पंचांग: प्रीती योगात कोणाला मिळणार जोडीदाराची साथ, तर कोणाचा वाढणार मान-सन्मान? वाचा १२ राशींचे शनिवारचे भविष्य