-
शिवाली परब (Shivali Parab) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि विनोदी कलाकार आहे.
-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमातील शिवालीच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे आणि अचूक कॉमेडी टायमिंगमुळे ती घराघरात पोहोचली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा केवळ एक विनोदी कार्यक्रम राहिला नसून प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
-
शिवालीने नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सेटवरील काही खास फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने सुंदर गुलाबी रंगाची पैठणी साडी आणि त्यावर शोभून दिसेल असा हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोंना शिवालीने ‘मराठमोळा शृंगार’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीचा हा पारंपरिक आणि आकर्षक लुक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून, या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला