-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) ‘लग्न आणि बरंच काही…’ (Lagna Aani Barach Kahi Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
“लग्न म्हणजे फक्त दोन मनांचं नातं नाही… तर दोन आयुष्यांसोबत येणारं ‘बरंच काही’!” अशी या चित्रपटाची लक्षवेधी टॅगलाईन आहे.
-
पूजा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाने निळ्या रंगाचा आकर्षक कट-आऊट वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर पूजाने हलका मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाईल करत तिचा लूक परिपूर्ण केला आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर यांनी सांभाळली आहे.
-
लग्नानंतरचे आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचे दार उघडत नाही, तर तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा आरंभ ठरते. हाच अनुभव ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घेता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
“डोंगरीत राहणारा मुलगा आवडतो हे सांगताच बाबांच्या पायाखालची जमीन सरकली”, ‘कमळी’ फेम योगिनी चौकने सांगितली प्रेमकहाणी; म्हणाली…