-
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘गनमास्टर जी ९’ (Gunmaster G9) हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
या सिनेमातील पहिले ‘अफसाना बनाया आपने’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून या गाण्यात महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलीया देशमुख हिची खास आणि मनमोहक झलक पाहायला मिळत आहे.
-
गाण्याच्या प्रसिद्धीदरम्यान जिनिलीयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका नव्या फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये जिनिलीयाने गडद लाल (रॉयल रेड) रंगाचा अत्यंत भव्य आणि आकर्षक असा एथनिक आउटफिट परिधान केला आहे.
-
तिने या लूकसोबत आकर्षक बटरफ्लाय हँड ॲक्सेसरी आणि गोल्डन एअर कफ परिधान करून तिच्या स्टाईलला मॉडर्न टच दिला आहे.
-
जिनिलीयाने या खास फोटोशूटच्या पोस्टला ‘God is kind – Life is good’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा सुंदर अवतार आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव