-
मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि लाडकी जोडी म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat).
-
६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रिया आणि उमेश यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांचा प्रेमाचा आणि लग्नाचा प्रवास अतिशय सुंदर व प्रेरणादायी आहे.
-
प्रिया आणि उमेश यांची पहिली भेट ‘आभाळमाया’ मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे ‘वादळवाट’ मालिकेच्या दरम्यान एका सामायिक (कॉमन) मित्राद्वारे ते पुन्हा संपर्कात आले.
-
त्यावेळी प्रिया कॉलेजमध्ये शिकत होती, तर उमेश अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत होता.
-
सुरुवातीच्या काळात त्यांनी आपले नाते मित्रपरिवारापासून आणि माध्यमांपासून थोडे लपवून ठेवले होते.
-
तसेच, कुटुंबीयांच्या पूर्ण संमतीनेच लग्न करायचे, असे त्यांनी आधीच ठरवले होते.
-
जवळपास ७ ते ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, या जोडीने ६ ऑक्टोबर २०११ रोजी (दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर) विवाहगाठ बांधली.
-
सध्या प्रिया आणि उमेश ‘जर तरची गोष्ट’ या गाजलेल्या नाटकाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
प्रियाच्या करिअरला, विशेषतः बॉलिवूड आणि वेब सीरिजमधील तिच्या कामाला उमेशने नेहमीच खंबीर पाठिंबा दिला आहे.
-
तर दुसरीकडे, उमेशच्या प्रत्येक कठीण प्रसंगात प्रिया त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
US Midterm Elections 2026 Results Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात; ट्रम्प यांची राजकीय परीक्षा, निकाल काय?