-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले असून दिवसेंदिवस या मालिकेची उत्सुकता वाढताना दिसत आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री ऋचा गायकवाड (Rucha Gaikwad) या मालिकेत ‘माया’ या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर ऋचाच्या पिवळ्या ड्रेसमधील लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
ऋचाने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा एक सुंदर अन् हटके डिझाईनचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या पिवळ्या ड्रेसला साजेसा मिनिमल मेकअप आणि हातात मोठं कडे घालून ऋचाने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना ऋचाने त्याला ‘Feeling Neon’ असे कॅप्शन दिले आहे.
-
याआधी ऋचाला ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘शेतकरी नवरा हवा’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋचा गायकवाड/इन्स्टाग्राम)
पुन्हा जंतर मंतर! अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचा ७ नोव्हेंबरला SIR विरोधात एल्गार; दिल्लीतील अटकेनंतर पहिलंच मोठं आंदोलन