-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे ही तिच्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते.
-
तितीक्षाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेल्या पारंपरिक पोशाखातील लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
तितीक्षाने या खास फोटोसेशनसाठी आकर्षक काळ्या रंगाची सुंदर पारंपरिक साडी परिधान केली आहे.
-
तिच्या साडीला लाल आणि पिवळ्या रंगाचा सुरेख बॉर्डरचा पदर असून त्यावर पारंपरिक नक्षीकाम दिसून येत आहे.
-
केसांचा सुंदर आंबाडा बांधून त्यावर तिने लावलेला रंगीबेरंगी गजरा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर दिलेल्या तिच्या या सुंदर आणि हसर्या पोजेस चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”