-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पाठराखीण’ या मालिकेत ‘भाग्यश्री’ची मुख्य भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौरी इंगवले सध्या ‘दशमी’ या नव्या चित्रपटातून भेटीला येत आहे.
-
येत्या २४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘दशमी’ चित्रपटाच्या ग्रँड ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी तिने खास ग्लॅमरस लूक केला होता.
-
या खास प्रसंगासाठी गौरीने डिझायनर जांभळ्या रंगाचा अत्यंत आकर्षक असा इंडो-वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता.
-
तिने सोन्याची नाजूक नक्षी असलेला कॉर्सेट ब्लाऊज आणि सुंदर सिल्क साडीचा स्कर्ट परिधान केला आहे.
-
आपला हा रॉयल लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात चोकर नेकलेस आणि त्याला मॅचिंग असलेले सुंदर कर्णफुले परिधान केली आहेत.
-
गौरीने या ट्रेलर लाँच सोहळ्यातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
तिचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौरी इंगवले/इन्स्टाग्राम)
MPSC : व्ही राधा समितीचा अहवाल कधी येणार, काय राहतील नवीन सुधारणा, अहवाल काय? मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण होणार