-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ (Tuhi Re Majha Mitwa TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
-
ही एक उत्तम युवा प्रेमकथा आहे. यात परस्पर नात्यांचे विविध पदर उलगडण्याबरोबरच दोन्ही मुख्य पात्रांमधील एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रेम आहे पण ते व्यक्त करता येत नाही आणि राग असूनही प्रेमापोटी तो आवरून ठेवावा लागतो, अशा दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा हळूहळू फुलत जाणार आहे; जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) ‘नम्रता देसाई’ ही भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच मधुराने एका खास साडी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने सुंदर काळ्या रंगाची इरकल साडी आणि त्यावर रंगीबेरंगी ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला साजेसा असा सुंदर नेकलेस आणि हातात बांगड्या घालून मधुराने आपला लूक परिपूर्ण केला आहे.
-
मधुराच्या या साडीतील फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)
Video: बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर अपघातात पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह ६ जणांचा मृत्यू; ‘हत्ती पर्वत’ भागात नेमकं काय घडलं?