-
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ व लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात.
-
सध्या त्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत शारदा ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
-
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्यांचा पारंपरिक आणि अत्यंत सुंदर लूक पाहायला मिळत आहे. त्यांनी पिवळ्या आणि हिरव्या या रंगांचा मिलाफ असलेल्या सुरेख काठपदराची साडी नेसली आहे.
-
गळ्यात मोत्यांचा ठुशीसारखा नेकलेस आणि लांब मंगळसूत्र परिधान करून त्यांनी हा साडी लूक पूर्ण केला आहे.
-
नाकात नथ, कपाळावर छोटी टिकली आणि हातातील बांगड्यांमुळे त्यांचा मराठमोळा अंदाज उठून दिसत आहे.
-
चाहत्यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या या पारंपरिक लूकवर कमेंट्सचा वर्षाव करीत फोटोंना तुफान पसंती दर्शवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया