-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा (Madhurani Gokhale) ‘कापूसकोंडा’ (Kapus Koonda Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
मधुराणी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिने मुंबईतील श्री सिद्धिविनायक, मुंबादेवी, बाबुलनाथ आणि आई महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
-
या वेळी मधुराणीने अबोली रंगाची आणि काळा काठ असलेली अत्यंत सुंदर सिल्क साडी नेसली होती.
-
या फोटोंना मधुराणीने ‘सारी पे मैं वारी..!’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने मधुराणी आणि प्रसिद्ध अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
-
‘कापूसकोंडा’ नावाच्या पोमेरेनियन प्रजातीच्या एका मिश्र (क्रॉस ब्रीड) कुत्र्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. प्राण्यावर आधारित हेच वेगळे कथानक या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
-
‘जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि.’ निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया