-
श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार आहे.
-
‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयाने आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि टाईमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
-
श्रेया सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्याबरोबर दुबईत फिरण्याचा आनंद घेत आहे.
-
या खास सफरनाम्यातील काही आकर्षक फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने पोपटी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट परिधान केली असून तिचा लूक अत्यंत फ्रेश दिसत आहे.
-
दुबईतील या फोटोंना श्रेयाने “Under The Dubai Sun..!!” असे सुरेख कॅप्शन दिले आहे.
-
श्रेयाच्या या फोटोंवर अभिनेत्री नेहा पेंडसेने “Vibe Indeed” तर मनवा नाईकने “Beautiful” अशी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया