-
झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki) ही केवळ एक कौटुंबिक मालिका नसून, स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांतील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांची प्रभावी मांडणी करणारी प्रेरणादायी कथा आहे.
-
या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ‘कृष्णाई’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.
-
निवेदिता यांच्या सशक्त अभिनयातून एका खंबीर आईचा संघर्ष आणि प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.
-
नुकतीच त्यांनी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’च्या नामांकन सोहळ्याला (Zee Marathi Awards 2026 Nomination Party) विशेष हजेरी लावली होती.
-
या नामांकन सोहळ्यासाठी निवेदिता यांनी सोनेरी रंगाच्या सुंदर जॅकेट गाऊनची निवड केली होती.
-
या सोनेरी लूकवर निवेदिता यांनी केलेला हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल त्यांच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती.
-
निवेदिता यांनी या फोटोंना ‘Simply Regal’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!