-
अभिनेत्री आकांक्षा गाडे ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या आकांक्षाने नुकतेच आपले काही नवीन आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये आकांक्षाने निळ्या रंगाची सुरेख काठपदराची साडी नेसली असून त्यावर लाल रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात अतिशय सुंदर सोन्याचा ठुशीसारखा नेकलेस आणि हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
तिच्या कानातील लाल रंगाचे झुमके आणि गुलाबाचे फूल तिच्या या संपूर्ण पारंपरिक लूकला अधिकच खास बनवत आहे.
-
कपाळावर लहानशी टिकली आणि मोकळ्या सोडलेल्या कुरळ्या केसांमुळे तिचा हा लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
तिच्या या नवीन फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: आकांक्षा गाडे/इन्स्टाग्राम)
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले