-
श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी या बॉलीवूड व टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आई-मुलीची जोडी आहे.
-
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिचा वाढदिवस पार पडला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून पलकने तिच्या या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पलकने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत तपकिरी रंगाचा सुंदर ड्रेस घातला असून त्यावर ग्लिटर वर्क करण्यात आले आहे.
-
वाढदिवस साजरा करताना पलकने बलून आणि केकबरोबरचे आनंदी क्षणांचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
-
पलकने या फोटोंना ‘Truly grateful’ अशी खास कॅप्शन देऊन सर्वांचे आभार मानले आहेत.
-
श्वेता तिवारीच्या लेकीचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून पलकवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पलक तिवारी/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक