-
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिच्या सासूबाई वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांच्यातील नातं सासू-सुनेपेक्षाही आई-मुलीसारखं आणि मैत्रिपूर्ण आहे.
-
वैशाली देशमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी आहेत.
-
वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या मनमोहक फोटोशूटसाठी जिनिलीया आणि वैशाली देशमुख यांनी सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे.
-
हे फोटो शेअर करताना जिनिलीयाने सासूबाईंसाठी एक भावूक कॅप्शन लिहिलं आहे, “हॅपी बर्थडे आई! कोणतीही भूमिका निभावण्याआधी स्वतःची ओळख जपण्याची आणि ‘मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे’ हा विचार करण्याची प्रेरणा तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार… हीच सुरक्षिततेची भावना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माझं तुमच्यावर असलेलं प्रेम शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचं आहे!”
-
वैशाली देशमुख यांनी जिनिलीयाला देशमुख कुटुंबात स्वतःच्या मुलीप्रमाणे स्वीकारले असून तिला प्रत्येक टप्प्यावर खंबीर पाठिंबा दिला आहे.
-
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेली जिनिलीया लग्नानंतर देशमुख घराण्यात पूर्णपणे रुळली आहे. मराठी सण-उत्सव परंपरांनुसार साजरे करणे आणि मराठी भाषा शिकणे, यामध्ये तिच्या सासूबाईंचा खूप मोठा वाटा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित : सुधारणा होईपर्यंत व्यवसाय बंद : पार्सल, होम डिलिव्हरी करता येणार नाही