-
झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ (Sa Re Ga Ma Pa Marathi Li’l Champs Marathi) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सांभाळत आहे.
-
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक बहुआयामी आणि गुणी कलाकार म्हणून ओळखले जाणारे नाव आहे.
-
अभिनयाबरोबरच नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांत मृण्मयीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मृण्मयीने ‘सारेगमप’ मराठीसाठी नुकताच एक ग्लॅमरस लूक केला असून, तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या कार्यक्रमासाठी मृण्मयीने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली असून, त्यावर जांभळ्या रंगाचा आकर्षक आरी वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
याबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, “हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय आणि सुरेल प्रवास आहे. इथे अतिशय सुंदर आणि आवडती गाणी ऐकायला मिळतात, ज्याने अनेक जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. ‘सारेगमप’चं सूत्रसंचालन करताना खूप आनंद होत आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
‘गोकुळ’च्या मोर्चातून विवेकानंद पाटीलचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाला, ‘कोल्हापूरकरांना हलक्यात घेऊ नका’