-
शिव ठाकरे (Shiv Thakare) हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेता, कोरिओग्राफर आणि रिॲलिटी शो स्टार आहे.
-
शिव हा भगवान शिवाचा निस्सीम भक्त असून तो वारंवार विविध धार्मिक स्थळांना भेट देत असतो.
-
नुकतीच त्याने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन बाबा महाकालचे दर्शन घेतले.
-
क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर जगभरातील शिवभक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
-
शिवने मंदिरातील प्रसिद्ध ‘भस्म आरती’त सहभाग घेतला, तसेच नंदीगृहात बसून महादेवाची पूजा-अर्चा करत आशीर्वाद घेतले.
-
या धार्मिक भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शिवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून, चाहत्यांकडून त्यावर पसंतीचा वर्षाव होत आहे.
-
या मंदिराच्या परिसरात ‘महाकाल लोक’ नावाचा अत्यंत भव्य आणि नयनरम्य कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते – रामदास आठवले