-
मराठी अभिनेत्री गायत्री दातार ही तिच्या सहज आणि उत्तम अभिनयशैलीमुळे महाराष्ट्रातील घराघरांत विशेष लोकप्रिय झाली आहे.
-
अभिनेत्री गायत्री दातारने नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
गायत्री दातार सध्या तिचा पती श्रीकांत चवरे याच्याबरोबर स्पेनमधील अतिशय निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वातावरणात सुट्यांचा आनंद घेत आहे.
-
श्रीकांत चवरेने त्यांच्या या सुंदर स्पेन ट्रिपमधील काही रोमँटिक आणि आकर्षक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्पेनमधील टोलेडो (Toledo) शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नयनरम्य परिसर आणि नदीचा अतिशय विलोभनीय देखावा पाहायला मिळत आहे.
-
फोटोंमधील लूकबद्दल बोलायचे झाले, तर गायत्रीने पांढऱ्या रंगाचा सुंदर शॉर्ट वन-पीस ड्रेस घातला असून, त्यावर पांढरे स्नीकर्स आणि गॉगल परिधान केला आहे.
-
टोलेडोच्या ऐतिहासिक पुलावर आणि निसर्गरम्य वातवरणात काढलेले हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: गायत्री दातार/इन्स्टाग्राम)
एक ॲपलमध्ये नोकरी करतोय, तर दुसऱ्याने सुरू केलंय स्टार्टअप; माधुरी दीक्षित म्हणाली, “मोठी झाली आता मुलं”