-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर हे दोघे लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
या जोडीचा बहुप्रतिक्षित ‘लग्न आणि बरंच काही…’ (Lagna Aani Barach Kahi) हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
“लग्न म्हणजे फक्त दोन मनांचं नातं नाही… तर दोन आयुष्यांसोबत येणारं ‘बरंच काही’!” अशी या चित्रपटाची अत्यंत अर्थपूर्ण आणि लक्षवेधी टॅगलाईन आहे.
-
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकर यांनी एक खास आणि देखणे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये पूजा सावंतने सुरेख केरी-जरीची नक्षी असलेली नारिंगी रंगाची पारंपरिक पैठणी साडी आणि त्याला साजेसे दागिने परिधान केले आहेत.
-
तर अभिजित खांडकेकरने पांढऱ्या कुर्त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले नारिंगी जॅकेट परिधान करून अतिशय रुबाबदार लूक साकारला आहे.
-
नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते या जोडीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकर/इन्स्टाग्राम)
“जीना यहाँ, मरना यहाँ, माँ और पापा के सिवाय, जाना कहाँ”, दिवाळीनिमित्त करीना कपूरची आई-वडिलांसाठी खास पोस्ट; म्हणाली…