-
नवरात्रोत्सवाच्या या पावन काळात सर्वत्र अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या खास प्रसंगी तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
सोनालीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो पोस्ट करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये सोनालीचा अत्यंत मोहक, सोज्वळ आणि पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे.
-
तिने परिधान केलेली नारिंगी रंगाची पैठणी साडी आणि त्यावर गुलाबी-सोनेरी बॉर्डर तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
नाकात छान पारंपरिक नथ आणि मोकळे केस तिच्या या लूकला अधिक आकर्षक बनवत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तिने, प्रथेप्रमाणे आजचा रंग वगैरे म्हणणार नाही नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! अशी विशेष कॅप्शन दिली आहे.
-
सोनालीच्या या खास फोटोंवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”