-
अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.
-
नवरात्रीच्या या पावन उत्सवानिमित्त ऋतुजाने खास नारिंगी रंगाच्या साडीत एक सुरेख फोटोशूट केले आहे.
-
नवरात्रीच्या उत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणीत करण्यासाठी तिने हा पारंपारिक आणि आकर्षक लूक साकारला आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने नेसलेली तजेलदार नारिंगी रंगाची पैठणी नऊवारी साडी तिच्या सौंदर्याला विशेष शोभा आणत आहे.
-
नारिंगी साडीवर तिने परिधान केलेला पिवळ्या रंगाचा नक्षीदार ब्लाऊज या संपूर्ण लूकला अतिशय देखणा उठव देत आहे.
-
चेहऱ्यावरील नाजूक नथ आणि कानातील सुंदर झुमके तिच्या या मराठमोळ्या रूपाला आणखी खास बनवत आहेत.
-
हातात अंगठ्या, कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि अंबाड्याची हेअरस्टाईल यामुळे ऋतुजाचा हा नवरात्री लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
“आमच्या डोक्यात हाच विचार होता की…”, सिराजसह १० चेंडूत २६ धावांच्या भागीदारीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? अर्शदीपने स्वत: सांगितलं