-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) ‘लग्न आणि बरंच काही’ (Lagna Aani Barach Kahi Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात पूजाबरोबर अभिनेता अभिजित खांडकेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
पूजा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून एका प्रमोशन इव्हेंटसाठी तिने हा ग्लॅमरस लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये पूजाने पिवळ्या रंगाचा, फुलांची डिझाईन असलेला सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावर पूजाने मॅचिंग नेकलेस, कानातले आणि बांगड्या परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
“काही नाती जुळतात, तर काही अलगद उलगडत जातात… एकमेकांसाठी दोन पावलं मागे येऊन, बरोबरीने चार पावलं पुढे जाण्याची ही सुंदर गोष्ट आहे!” असे या चित्रपटाचे कथानक सांगते.
-
या चित्रपटातील ‘मला लग्नाची झालीया घाई’ आणि ‘साखरपुडा’ ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!