-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
-
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून प्राप्तीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अतिशय सुंदर आणि मनमोहक फोटोशूट शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या या विशेष फोटोंमध्ये प्राप्ती रेडकरने अत्यंत आकर्षक अशी नारिंगी रंगाची पारंपरिक पैठणी साडी परिधान केलेली पाहायला मिळत आहे.
-
या नारंगी रंगाच्या रेशमी साडीवर तिने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊझ परिधान करून आपला लूक अधिकच देखणा आणि उठून दिसणारा केला आहे.
-
कधी मंद स्मितहास्य करत तर कधी दूरवर निहाळत दिलेल्या तिच्या वेगवेगळ्या पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
तिच्या या सणउत्सवाला साजेशा पारंपरिक लूकवर आणि साडीच्या सुंदर निवडीवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अभिनेत्री प्राप्ती रेडकरचा हा नवरात्री विशेष पारंपरिक लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
लग्नानंतरची पहिलीच दिवाळी? मग नवऱ्याला द्या पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा; ‘या’ फ्री HD Images करा शेअर