-
कीर्तनातून प्रसिद्धीझोतात आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणारा ‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futaacha Bachchan Movie) हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
आधी एकपात्री प्रायोगिक नाटक म्हणून गाजलेली ही कथा आता चित्रपटाच्या रूपाने मोठ्या पडद्यावर आली आहे.
-
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी नलावडेने (Gauri Nalawade) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौरीने केलेल्या सुंदर फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौरीने जांभळा काठ असलेली लाल रंगाची मनमोहक इरकल साडी आणि त्यावर पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
गौरीबरोबर या चित्रपटात शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितीश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
“इराण युद्धाला संरक्षण मंत्री जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; पीट हेगसेथ यांच्यावरील महाभियोग खटल्यावरूनही मांडली भूमिका