-
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाच्या विशिष्ट रंगाला विशेष महत्त्व असून, आज या उत्सवाचा दुसरा दिवस साजरा केला जात आहे.
-
आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचे विशेष महत्त्व असून, हा रंग शांतता, पवित्रता व निर्मळतेचे प्रतीक मानला जातो.
-
मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व यशस्वी निर्माती श्वेता शिंदे हिने आपल्या उत्कृष्ट मालिकांच्या निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे आणि हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नवरात्रोत्सवाच्या या शुभ प्रसंगी अभिनेत्री श्वेता शिंदे हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करीत चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आजच्या पांढऱ्या रंगाच्या खास औचित्यावर श्वेता शिंदे हिने लाल आणि गुलाबी रंगाची बॉर्डर असलेली पांढरी बनारसी पैठणी साडी परिधान केली आहे.
-
एका फोटोत हातात मोरपीस धरून दिलेली पोज आणि अंबाड्यावर सजवलेली सुगंधी फुले तिच्या या रॉयल लूकला अधिक खास बनवत आहेत.
-
श्वेता शिंदे हिचा हा पारंपरिक आणि नेटका साडी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
“मोदींचे उच्चभ्रू सत्ताधाऱ्यांना टाळणे मी समजू शकते, पण…”; आत्मचरित्रातून सोनिया गांधींचे मोदींबाबत मोठे भाष्य!