-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay TV Show) या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेची कथा ‘देवमाणूस’च्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाच्या (सीझन) मधील घडामोडींवर आधारित आहे.
-
या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
नुकतीच किरणने ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’च्या नामांकन पार्टीला (Zee Marathi Awards 2026 Nomination Party) हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यासाठी त्याने फिकट पिवळ्या रंगाचा शर्ट, मॅचिंग पॅन्ट आणि पेस्टल फ्लोरल प्रिंटेड ब्लेझर असा आकर्षक सूट परिधान केला होता.
-
हे फोटो शेअर करत किरणने “प्रत्येक पावलाची एक गोष्ट असते, प्रत्येक क्षणाची एक आठवण असते… इथे आल्याचा आनंद वाटतो!” असे भावूक कॅप्शन दिले आहे.
-
किरणच्या या नव्या आणि स्टायलिश लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड/इन्स्टाग्राम)
“पराभव मान्य करायला हवा होता”; राज ठाकरेंनी ‘गोकुळ’वरून भाजपाला सुनावलं; म्हणाले, “हा एकमेव पक्ष…”