-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता परब ही तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली असून, प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवत आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताने नवरात्रीच्या उत्सवाचे औचित्य साधून एक खास फोटोशूट शेअर केले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर आणि पारदर्शक साडी नेसली आहे.
-
या पांढऱ्या साडीवर असणारी पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलांची चित्रे तिच्या या सौंदर्याला अधिकच खुलवत आहेत.
-
गळ्यात मोत्यांचा दोन पदरी सुंदर हार आणि लहानशी टिकली लावून तिने अत्यंत साधा, पण आकर्षक साज परिधान केला आहे.
-
प्राजक्ताचा हा साधा, शांत आणि प्रसन्न अवतार तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून, तिच्या या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता परब/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”