-
Kiara Advani Sidharth Malhotra Family Vacation: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
-
गरोदर असल्याची गोड बातमी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कियाराने तिच्या फॅमिली व्हॅकेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या कौटुंबिक सहलीचे फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये “Gratitude” (कृतज्ञता) असे लिहिले आहे.
-
कियारा आणि सिद्धार्थने जुलै २०२५ मध्ये जन्मलेल्या आपल्या सराया (Saraayah) या लेकीचा चेहरा अजूनही चाहत्यांपासून लपवून ठेवला आहे.
-
या व्हॅकेशन दरम्यान बीचवर फिरताना कियाराने मुलीच्या चिमुकल्या पायांची एक सुंदर झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
कियाराने स्विमिंग पूलजवळ उन्हाचा आनंद घेतानाचा फोटो, वाळूवर उमटलेले तिघांच्या पायांचे ठसे, सिद्धार्थसोबतचा एक क्युट मिरर सेल्फी आणि निसर्गरम्य तलावाकाठी विश्रांती घेतानाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच कियारा आणि सिद्धार्थने एका खास पोस्टद्वारे त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. या पोस्टमध्ये त्यांच्या हातांत चिमुकल्या बाळाचे लोकरीचे मोजे दिसत होते. “पुन्हा एकदा एका सुंदर भेटवस्तूचा आशीर्वाद मिळाला आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आलं आहे,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कियारा अडवाणी/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव