-
सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आणि गरबा-दांडियाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
-
याच खास निमित्ताने अभिनेत्री गिरिजा प्रभूने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गिरिजाने अत्यंत आकर्षक आणि भरजरी असा पारंपरिक लेहंगा परिधान केला आहे.
-
तिचा लेहंगा गुलाबी, हिरवा आणि निळा यांसारख्या विविध रंगांच्या सुरेख नक्षीकामाने व टिकल्यांच्या कामाने सजलेला आहे.
-
गळ्यात शोभून दिसणारा जड चोकर हार, कानातले झुमके आणि कपाळावरील बिंदियाने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
-
हातात घातलेले सोन्याचे गोल कडे आणि गोटा-पट्टीने सजवलेली लांब वेणी तिच्या लूकला एक खास पारंपरिक टच देत आहे.
-
नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर गिरिजाचा हा पारंपारिक आणि मनमोहक अवतार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
“पराभव मान्य करायला हवा होता”; राज ठाकरेंनी ‘गोकुळ’वरून भाजपाला सुनावलं; म्हणाले, “हा एकमेव पक्ष…”