-
सोनी मराठी वाहिनीवर १२ ऑक्टोबरपासून ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
या कार्यक्रमात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
-
माधुरी यांनी गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रे हाती घेणार आहेत.
-
ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा, सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ मिळवून देणारा आणि प्रत्येक प्रश्नातून आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणांचा, आशांचा आणि नव्या शक्यतांचा उत्सव ठरणार आहे.
-
या कार्यक्रमासाठी माधुरी यांनी हिरव्या रंगाच्या साडीत एक अत्यंत सुंदर लूक केला होता.
-
माधुरी यांनी या हिरव्या साडीवर आकर्षक डिझाईनचा ब्लाऊज आणि त्याला साजेसे सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
अनेक दशकांपासून अभिनेत्री, नृत्यांगना आणि परफॉर्मर म्हणून आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरी दीक्षित यांच्यासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांशी एका वेगळ्या पद्धतीने जोडले जाण्याची उत्तम संधी घेऊन आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला