-
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंचावर खास हजेरी लावली होती.
-
सोमवार, १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या भव्य शुभारंभाच्या विशेष भागात सोनाली हॉटसीटवर विराजमान झाली होती.
-
‘आता खेळ बदलणार’ या घोषवाक्याला साजेसा हा विशेष भाग मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
-
प्राण्यांप्रती असलेल्या विशेष प्रेमापोटी सोनाली बेंद्रे ‘हॅपी पेट फाउंडेशन’ या संस्थेला पाठिंबा देण्यासाठी हा खेळ खेळत आहे. या भागात ती प्राण्यांच्या कल्याणासाठी करत असलेल्या कामाबद्दल, तसेच तिच्या ‘हॅपी पॉडकास्ट’ या उपक्रमाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसणार आहे.
-
या विशेष भागासाठी सोनालीने काळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला असून तिचा हा लूक अत्यंत ग्लॅमरस दिसत होता.
-
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सांभाळत आहे.
-
या मंचावर आपल्या भावना व्यक्त करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “सोनाली आणि मी आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही! आज अखेर आपण ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एकत्र आलो आहोत. हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात तुझ्यासोबत होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. तुझ्यासोबत एकाच मंचावर येणे माझ्यासाठी अतिशय खास असून हा एक सोहळाच आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)
अमेरिकेत विमान सेवा ठप्प; सर्व विमानांची उड्डाणे थांबवली; हजारो प्रवाशांची गैरसोय, काय घडलं?