-
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री व कुशल शास्त्रीय नृत्यांगना ऊर्मिला कानेटकर ही तिच्या उत्तम अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
चित्रपट, मालिका आणि नृत्य क्षेत्रात आपल्या खास कौशल्याची छाप पाडणाऱ्या ऊर्मिलाचा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर सक्रिय आहे.
-
सध्या देशभरात नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून या खास सणानिमित्त विविध कलाकारांचे खास लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
-
नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिनेही एक खास आणि सुंदर फोटोशूट केले आहे. या खास फोटोशूटसाठी ऊर्मिलाने निळ्या रंगाची अत्यंत देखणी आणि पारंपरिक साडी नेसली आहे.
-
तिच्या या निळ्या साडीवर आकर्षक सोनेरी मोरांचे भरतकाम (जरीकाम) केले असून तिने लाल रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
-
या सुंदर साडीवर तिने नाकात नथ, गळ्यात नाजूक नेकलेस, हातात सोन्याची बांगडी आणि पारंपरिक दागिन्यांची उत्तम सजावट केली आहे.
-
मागे झेंडूच्या फुलांच्या माळा आणि ऊर्मिलाची नजाकतदार पोज यामुळे तिचा हा नवरात्रीतील साडी लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
एनव्हिडियाच्या सीईओंचे तिसरे प्रेमप्रकरण उघड; कंपनीतीलच आणखी एका महिला कर्मचाऱ्याशी होते संबंध