-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध व सौंदर्यवती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या अभिनय आणि खास लूकमुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
-
नवरात्रीच्या उत्सवानिमित्त सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गडद निळ्या रंगाच्या साडीतील अत्यंत देखणे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गडद निळ्या रंगाची रेशमी साडी परिधान केली असून, त्यावर लाल आणि सोनेरी रंगाची नक्षी असलेला पदर उठून दिसत आहे.
-
सोनालीचा हा पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात सोनेरी चोकर हार, कानात पारंपरिक झुमके आणि हातात सुंदर बांगड्या घातल्या आहेत.
-
चेहऱ्यावर पारंपरिक नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून तिने आपल्या या मराठमोळ्या साध्या तरीही देखण्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नवरात्रीच्या काळात गडद निळ्या रंगाचा ट्रेंडी लूक कसा करावा, याचा एक उत्तम वस्तुपाठच सोनालीने या फोटोंच्या माध्यमातून दिला आहे.
-
सोनालीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
गौरव मोरे, विशाखा सुभेदार अन् ओंकार भोजने; कोणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले…