-
श्रेया बुगडे ही मराठी टेलिव्हिजन आणि मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय, अष्टपैलू अभिनेत्री तसेच उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून ओळखली जाते.
-
शारदीय नवरात्रीनिमित्त श्रेयाने केलेल्या एका खास फोटोशूटने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
आज नवरात्रीचा चौथा दिवस असून आजचा रंग निळा आहे. निळा रंग हा शांतता, शीतलता आणि स्निग्धतेचे प्रतीक मानला जातो.
-
या फोटोशूटसाठी श्रेयाने निळ्या रंगाची अत्यंत सुंदर महेश्वरी साडी नेसली असून, त्यावर लाल रंगाचा आकर्षक स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी श्रेयाने हातात लाल बांगड्या आणि गळ्यात मोत्यांच्या दागिन्यांचा सुरेख साज केला आहे.
-
महेश्वरी साडी हा मध्य प्रदेशातील ‘माहेश्वर’ या शहरात तयार होणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि पारंपरिक हातमाग प्रकार आहे.
-
या साडीचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू होतो. इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी राजेशाही परिवार आणि आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी ही महेश्वरी साडी विशेषतः तयार करून घेतली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
Video: ‘भारत समिट’मधील परदेशी पाहुण्यांच्या अनुपस्थितीबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी; परराष्ट्र मंत्रालयाचेही प्रत्युत्तर