-
बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या नजाकतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी माधुरी नेहमीच तिच्या नवनवीन आणि क्लासिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच माधुरीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही अत्यंत मोहक आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या ताज्या फोटोंमध्ये तिने परिधान केलेल्या साडीतील सौंदर्य पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
या खास फोटोसेशनसाठी तिने लाल, हिरवा आणि गुलाबी रंगसंगती असलेली पारंपरिक साडी परिधान केली आहे.
-
हे फोटो पोस्ट करताना तिने ‘Not hiding, just making you look twice’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
माधुरीचा हा पारंपरिक आणि राजेशाही लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज