-
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या शोमुळे चर्चेत आहे. पहिल्यांदाच एक अभिनेत्री KBC च्या मराठी सीझनची धुरा सांभाळतेय. यादरम्यान, माधुरीबद्दलचे तिच्या फिल्मी करिअरचे, बालपणीचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
काही महिन्यांपूर्वीच राहिद सोलकर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने माधुरीच्या कोकणातील गावी भेट दिली होती. तसेच दीक्षित कुटुंबीयांचं घरही दाखवलं होतं. ‘धकधक गर्ल’चं मूळ गाव कोणतं आहे? जाणून घेऊयात…
-
माधुरी दीक्षितचं गाव कोकणातील देवगड तालुक्यात ‘पडेल’ याठिकाणी आहे.
-
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राहिदने माधुरीचे चुलत भाऊ विकास दीक्षित यांची मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी ‘धकधक गर्ल’चं गावचं घर आणि तिच्या आजोबांबद्दल माहिती सांगितली.
-
विकास दीक्षित ( माधुरीचे चुलतभाऊ ) म्हणतात, “आमच्या गावाचं नाव आहे पडेल. आमचा तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग. १९५० मध्ये माधुरीचे आजोबा रामचंद्र दीक्षित यांचं इथे घर होतं. ते इथून मुंबईला व्यवसायानिमित्त गेले होते. तिकडे ते शेअर ब्रोकर म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांनी दादरला शिवाजी पार्कच्या समोर घर घेतलं होतं. त्या बंगल्यातच माधुरीचा जन्म झाला.”
-
विकास दीक्षित पुढे सांगतात, “रामचंद्रभाऊंचे चिरंजीव शंकर यांची माधुरी ही मुलगी आहे. लहानपणी ती आई-वडिलांबरोबर गावी यायची. पण, त्यानंतर सिनेविश्वात एन्ट्री घेतल्यावर तिला गावी यायला वेळ मिळायचा नाही.”
-
“आता बरीच वर्षे ती गावी आलेली नाहीये पण, तिचे आई-वडील होते तेव्हा ते गावी यायचे. आमची माधुरी सुपरस्टार झाली याचा आम्हाला खूप-खूप अभिमान आहे. आमच्या कोकणाचं नाव तिने मोठं केलं.” असं तिच्या चुलत भावाने सांगितलं.
-
माधुरीचं आजोळ ( अभिनेत्रीच्या आईचं माहेर ) रत्नागिरीत आहे.
-
गाव कोकणात असल्यामुळेच माधुरीला कोकण विशेष आवडतं. बालपणीच्या गावच्या जुन्या आठवणी तिने अनेकदा सांगितल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राहिद )
एक ॲपलमध्ये नोकरी करतोय, तर दुसऱ्याने सुरू केलंय स्टार्टअप; माधुरी दीक्षित म्हणाली, “मोठी झाली आता मुलं”