-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून आहे.
-
सध्या देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे.
-
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्राजक्ताने कोल्हापूर येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दरबारी देवीचे दर्शन घेतलेले फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या रंगानुसार पिवळ्या रंगाचा अतिशय देखणा पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.
-
पिवळ्या कुर्त्यासोबत घेतलेली गुलाबी ओढणी आणि कपाळावरील टिळा तिच्या या सोज्वळ रूपाला अधिकच शोभा आणत आहे.
-
तिचे हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
कामाबद्दल सांगायचे तर प्राजक्ता गायकवाड सध्या ‘पाठराखीण’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
एक ॲपलमध्ये नोकरी करतोय, तर दुसऱ्याने सुरू केलंय स्टार्टअप; माधुरी दीक्षित म्हणाली, “मोठी झाली आता मुलं”