-
बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्याने आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने ही कला आणि वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत लोकप्रिय व लाडकी जोडी म्हणून ओळखली जाते.
-
गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांमधील प्रेम, परस्पर आदर आणि घट्ट बंध प्रेक्षकांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरला आहे.
-
आज माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाचा २७ वा वाढदिवस असून या खास दिनानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
लग्नाच्या २७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर माधुरीसोबतचे काही दुर्मीळ आणि जुने फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावर हे जुने फोटो शेअर करत डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असून हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
-
फोटो शेअर करताना डॉ. नेने यांनी ‘Happy 27th anniversary, my love. To infinity and beyond, together.’ अशी प्रेमळ कॅप्शन लिहीत माधुरीवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रीराम नेने/इन्स्टाग्राम)
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया