-
देशभरात सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जात आहे.
-
नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्याची खास परंपरा पाळली जाते. आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून आजचा विशेष रंग हिरवा आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि सौंदर्याची खाण मानली जाणारी अभिनेत्री श्रुती मराठे हिने या खास प्रसंगी तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचे औचित्य साधून श्रुतीने हिरव्या रंगाच्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
-
निसर्गाच्या सुंदर पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोंमध्ये श्रुतीचा एलिगंट आणि ट्रेडिशनल लूक उठून दिसत आहे.
-
श्रुतीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ‘Nature understood the assignment.’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
तिचे हे हिरव्या पोशाखातील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज