-
नवरात्रीच्या पावन आणि उत्साही उत्सवामुळे सध्या सगळीकडे आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि अत्यंत सौंदर्यवती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
आपल्या अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या खास स्टाईल आणि नवनवीन लूकमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.
-
या नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही अत्यंत देखणे आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
-
सोनालीने सोनेरी जरीचे नक्षीकाम (जरी वर्क) असलेली सुंदर हिरव्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा हिरवा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तिने गळ्यात शोभून दिसणारा सुंदर हार तसेच पारंपरिक दागिने आणि केसांत गजरा माळून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
सोनालीचा हा पारंपारिक आणि सात्विक साडी लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!