-
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना ऊर्मिला कानेटकर ही नेहमीच आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे.
-
नवरात्रीच्या प्रसन्न वातावरणात ऊर्मिलाने तिच्या साडीतील आकर्षक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
अभिनेत्रीने नुकतेच नवरात्रीनिमित्त साडीवर आधारित एक नवीन आणि मनमोहक फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये उर्मिलाने हिरव्या आणि सोनेरी-पिवळ्या रंगाची एक क्लासिक रेशमी साडी नेसली आहे, जी तिला खूप शोभून दिसत आहे.
-
साडीच्या रंगांना पूरक असा निळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करून तिने पारंपारिक साडीला आधुनिक टच दिला आहे.
-
कानात मोठे सुंदर झुमके, हातात पांढऱ्या मण्यांचे ब्रेसलेट आणि कपाळावर छोटीशी टिकली, या साध्या पण प्रभावी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नवरात्रीच्या या शुभप्रसंगी ऊर्मिलाचा हा साडीतील लूक चाहत्यांसाठी फॅशनची नवी प्रेरणा ठरत असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऊर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
9