-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी गोखलेचा (Madhurani Gokhale) आगामी ‘कापूसकोंडा’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘कापूसकोंडा’ (KapusKoonda Movie) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटात मधुराणी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
प्रमोशन दरम्यानचे साडीतील काही सुंदर फोटो मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मधुराणीने गुलाबी रंगाची कॉटन चेक्स साडी आणि त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
मधुराणीने या फोटोंना “तुम्हाला तुमचं काम मनापासून आवडत असेल, तर ते दिसून येतंच…!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. तसेच सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!