-
Shardiya Navratri 2026: आज शारदीय नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची विशेष पूजा केली जाते.
-
आजचा शुभ रंग राखाडी आहे. राखाडी रंग हा स्थिरता, शांतता आणि समतोलाचे प्रतीक मानला जातो.
-
तसेच हा रंग संयम आणि व्यावहारिक विचारांचे महत्त्व दर्शवतो.
-
याच खास मुहूर्तावर लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तिचे काही विशेष फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने हिरवा काठ असलेली सुंदर राखाडी सिल्क साडी नेसली आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने आरी वर्क केलेला ब्लाऊज आणि आकर्षक दागिन्यांचा साज केला आहे.
-
हे फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिले आहे, “मुलींसाठी : राखाडी रंग आपल्याला शिकवतो की, आयुष्यात कितीही चढ-उतार आले किंवा संकटं आली, तरी स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमावू नका!”
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाने ५ लाखांचा दंडही ठोठावला, कारण काय?