-
नवरात्रीच्या या पावन उत्सवात श्री जगदंबेच्या नऊ विविध रूपांची (नवदुर्गा) अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते.
-
नवरात्रीचा आज सातवा दिवस (१७ ऑक्टोबर, शनिवार) असून या शुभ दिवशी देवी कालरात्रीची मनोभावे उपासना करण्याची परंपरा आहे.
-
या सातव्या दिवसाचा विशेष रंग राखाडी असून, आजच्या दिवशी राखाडी रंगाची वस्त्रे परिधान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रेशमा शिंदे हिने या खास प्रसंगी राखाडी साडीतील तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रेशमाने या वेळी राखाडी रंगाची अत्यंत आकर्षक पारंपरिक बनारसी सिल्क साडी नेसली असून, त्यावर जांभळ्या रंगाचा शोभून दिसणारा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आपल्या या पारंपरिक लूकला पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात सोनेरी कुंदन हार, कानात नाजूक झुमके आणि केसांत गुलाबी-पांढऱ्या फुलांचा गजरा माळला आहे.
-
रेशमाचा हा नयनरम्य आणि पारंपरिक साडीतील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
लग्नानंतरची पहिलीच दिवाळी? मग नवऱ्याला द्या पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा; ‘या’ फ्री HD Images करा शेअर