-
Shardiya Navratri 2026: झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) मालिकेत पुढे काय नवीन घडणार आणि कोणतं महत्त्वाचं मिशन समोर येणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
-
सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह असून याच निमित्ताने ‘तारिणी’ मालिकेच्या सेटवर पारंपरिक ‘भोंडला’ मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या मालिकेतील अभिनेत्री नियती राजवाडेने सेटवरील भोंडल्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
भोंडल्याच्या खेळात मध्यभागी हत्तीची सजवलेली मूर्ती ठेवली जाते किंवा रांगोळीने हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठिकाणी मूगडाळ आणि तांदळाच्या साहाय्याने हत्तीची सुंदर प्रतिकृती तयार केली जाते.
-
त्यानंतर या पाटाभोवती स्त्रिया आणि लहान मुली फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी गातात.
-
नियतीने हे फोटो शेअर करत अतिशय सुंदर कॅप्शन दिलं आहे, “भोंडल्याचा फेर, परंपरेचा साज, मराठमोळ्या संस्कृतीचा आज वेगळाच थाट!”
-
“गाणी भोंडल्याची, नाती जिव्हाळ्याची, रंगत वाढली आमच्या तारिणी परिवाराची!”
-
(सर्व फोटो सौजन्य : नियती राजवाडे/इन्स्टाग्राम)
सतत दारु प्यायल्याने लिव्हर किती वर्षांनी आणि कसे होते फोल? कोणती लक्षण दिसतात जाणून घ्या डॉक्टरांकडून