-
Ashwini Mahangade Bhushan Shivtare Haladi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकतीच अभिनेता व कुस्तीपटू भूषण शिवतारेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अश्विनीने नुकतेच तिच्या हळदी सोहळ्यातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही मोजकेच जवळचे मित्र-मैत्रीण सहभागी झाले होते.
-
हळदीच्या कार्यक्रमासाठी अश्विनीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती; तर भूषणने क्रीम रंगाच्या कुर्त्या-पायजम्यामध्ये खास लूक केला होता.
-
हे फोटो शेअर करत अश्विनीने एक भावूक कॅप्शन लिहिलं आहे, “हळद… प्रेमाची आणि आदराची.. लग्नातील हळद म्हणजे केवळ अंगाला लावली जाणारी हळद नसते, तर ती आपल्या माणसांच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि आनंदाचा सोहळा असतो. प्रत्येक विधीमागे एक भावना असते, प्रत्येक स्पर्शामागे आशीर्वाद असतो आणि प्रत्येक नात्यात प्रेमासोबतच आदरही असतो. कारण शेवटी लग्न सुंदर होतं ते त्या सोहळ्यात सहभागी झालेल्या माणसांच्या प्रेमाने! हळदीचे रंग अंगावरून उतरतीलही, पण या दिवसाने दिलेल्या प्रेमाच्या आठवणी आयुष्यभर मनात कायम राहतील.”
-
अश्विनी व भूषणचा हा विवाह सोहळा पाचगणी येथील एका निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये पार पडला.
-
सध्या या नवविवाहित जोडप्याच्या हळदीच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
“मला वाईट वाटलं होतं, पण…”; अभिजीत दिपकेंची पंजाबी गायक दिलजीत दोसांझबद्दलची पोस्ट चर्चेत