-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लवकरच ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ (Shubh Mangalam Jodi Dangalam Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त प्राजक्ता राजस्थानला (Rajasthan) गेली होती.
-
शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ताने राजस्थानची सफर केली आणि सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
समृद्ध इतिहास, भव्य किल्ले आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी राजस्थान हे राज्य जगभरात प्रसिद्ध आहे.
-
या फोटोंना कॅप्शन देत प्राजक्ता म्हणाली, “मला नेहमीच राजस्थानला जायचं होतं. मी माझ्या कुटुंबाकडे या ट्रिपसाठी सतत हट्ट करत होते आणि शेवटी मी माझी ही इच्छा पूर्ण करून दाखवलीच.”
-
“आजचा दिवस किती भारी होता… तिथलं सौंदर्य पाहून मी पूर्णपणे भारावून गेले. मला या जागेचं एवढं आकर्षण का होतं आणि याला ‘रंगिलो राजस्थान’ का म्हणतात, हे मला आज खऱ्या अर्थाने समजलं.”
-
“तो सोन्यासारखा चमकणारा किल्ला, कोरीव काम केलेल्या हवेल्या, ते रंग, ती धावपळ आणि तरीही तिथली शांतता… जरी हे फक्त एकच शहर होतं, तरी जैसलमेरने मला संपूर्ण राजस्थानची झलक दाखवून दिली.”
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक